Monday, August 16, 2010

अशी असेल जिजाऊ सृष्टी ...
मराठा सेवा संघाने सिदखेडराजा येथे नवीन नागपूर -मुंबई एक्सप्रेस हायवेवर स्वत:च्या जागेत जिजाऊ धर्मपीठ व जिजाऊ मंदिर अशा सामूहिक ’जिजाऊ सृष्टी’चे निर्माण कार्य सुरू केले आहे. सिंदखेडराजा हे मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील शिवसंस्कृतीचे आदिपीठ आहे. मध्ययुगीन कालखंडामध्ये राजमाता जिजाऊंचे कर्तृत्वामुळे अवघी शिवसंस्कृती एकसूत्रात बद्ध झाली होती. स्वाभाविकच शिवसंस्कृतीच्या या अर्वाचिन उगमस्थानाला म्हणजेच सिंदखेडराजाला एक आगळे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. राजमाता, राष्ट्रमाता, जिजाऊंच्या जन्माचे वेळी ४५,००० लोकवस्तीच्या या शहरात त्या काळातील लखुजीराजाचा राजवाडा, रंगमहाल, सावकारवाडा, काळाकोट, लखुजी राजांची समाधी, पुतळा बारव, सजना बारव, गंगासागर, बाळसमुद्र या नावाच्या विहिरी, चांदणीतलाव, मोतीतलाव हे ऐतिहासिक जलसाठे बघण्याजोग्या वास्तू आहेत. त्यापैकी मोती तलावाच्या बाजूच्या पठारावर जिजाऊ सृष्टीची जागा निवडण्यात आली आहे. या पठार शिवारात राजमाता जिजाऊ घोडय़ावरून फेरफटका मारायच्या. त्या ठिकाणी युद्धकलेचे, राजकारणाचे शिक्षण घेत होत्या त्याच तीर्थावर आज साकारणार आहे जिजाऊ सृष्टी.जिजाऊ सृष्टी प्रकल्प हा देशाच्या स्वाभिमानाचा राष्ट्रीय प्रकल्प व्हावा, हे जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र व्हावे, असा सर्वोच्च विचार यामागे आहे. त्यानुसार जिजाऊ सृष्टी हा विविध विषयांना सामावून घेणारा एकत्रित स्वरूप प्रकल्प व्हावा तो अद्यावत तीर्थक्षेत्र वा ज्ञानक्षेत्र व्हावे, ही संकल्पना आहे. जिजाऊ संग्रहालय, जिजाऊ ग्रंथालय, महिला रोजगार केंद्र, महिला मिलिटरी अ‍ॅकेडमी, संशोधन केंद्र, महिला विद्यापीठ अशा संस्थांची निर्मिती व्हावी, अशी योजना आहे. त्यात ध्यानमंदिर, संशोधन विभाग, प्रार्थनास्थळांची रचना करणे, विज्ञाननिष्ठ परंपरा वृध्दींगत करणारे मेळावे भरवणे, विश्वशांती व एकसंघतेसाठी विविध चर्चासत्राचे आयोजन, विविध विषयाचे प्रशिक्षण, कार्ड कॅम्पस, कमांडो फोर्स, ट्रेनिंग सेंटर यासारख्या विविध योजना, सर्व बहुजन समाज, विज्ञाननिष्ठ, कर्मनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ बनवून संपूर्ण विश्वामध्ये मानवा-मानवा मध्ये समता, समानता, बंधुत्वाची आचारसरणी व विचारसरणी मांडणारा तयार व्हावा, अशी मांडणी व आखणी करणे, हा जिजाऊ सृष्टीचा मुख्य उद्देश आहे.भारताच्या सुमारे १०,००० वर्षांचा सांस्कृतिक इतिहास, जिजाऊ काळातील देशातील सर्व क्षेत्रातील स्थिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील महत्वाचे प्रसंग ते इ.स. २००५ पर्यंतची देशाची वाटचाल, बहुजन समाजातील सर्व समजासुधारक, संतांची शिकवण चित्ररूपाने, शिल्परूपाने, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाच्या सहाय्याने लिखीत स्वरूपात विविध प्रकारे चित्रीत केली जाईल.

Saturday, January 16, 2010

JIJAU SRUSHTI,SINDKHEDRAJA-जिजाऊ सृष्टी,सिंदखेडराजा.12 JAN 2010.


जिजाऊ स्मारकाचे पहिल्या टप्प्यातील बांधकाम.JIJAU INTERNATIONAL MEMORIAL,JIJAU SRUSHTI,SINDKHEDRAJA.

जिजाऊ सृष्टीतील जिजाऊ स्मारकावरील रोषणाई .

जिजाऊला वंदन करताना शिवबा. SHIVAJI MAHARAJ STATUE AT JIJAU SRUSHTI.

जिजाऊ सृष्टी वरील स्मारकातील जिजाऊंची मूर्ती-JIJAU STATUE AT JIJAU SRUSHTI.
जिजाऊ सृष्टीवरील अतिभव्य सभागृहात प्रबोधनपर कार्यक्रम चालू असताना...

शिवधर्म ध्वज निळ्या आसमंतात फडकताना...

शिवधर्मपीठावरून मार्गदर्शन करताना शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर,युवराज संभाजीराजे भोसले,वसंत पुरके,फौजिया खान व शिवधर्म संसद.