Saturday, June 14, 2008

२४ सप्तेम्बर शिवधर्मपीठ स्थापनेचा नवा इतिहास

जगाच्या इतिहासात २४ सप्तेम्बर २००७ हा दिवस रत्नजडित सुवर्नाक्षरात लिहीला जाईल. १२ जानेवारी २००५ रोजी वैदिक ब्राम्हणी धर्माची कोळीष्टके,जळमट झाडून सुमारे १५ लाख लोकांनी शिवधर्माचं प्रकटन केलं. शिवधर्मदिक्षेपूर्वीची तयारी म्हनून शिवधर्मपीठाची २४ सप्तेम्बर २००७ ला जिजाऊसृष्टी सिंदखेडराजा (जि.बुलढाणा) महाराष्ट्र येथे विधिवत स्थापना करन्यात आली.

Wednesday, June 11, 2008

shivdharmapith

jai jiau ..


जिजाऊ सृष्टीवर पुस्तकांची विक्रमी विक्री

- मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टीवर जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त झालेल्या शिवधर्म दीक्षा सोहळ्यादरम्यान विक्रमी पुस्तकांची विक्री झाली. सुमारे १० लाख पुस्तकांचा खप झाला असून, त्यामध्ये आंबेडकरी साहित्याचा खप मोठ्या प्रमाणावर झाला आहे. .......मराठा सेवा संघाच्या वतीने सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टीवर शिवधर्म दीक्षा सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी लाखो बहुजन बांधवांना शिवधर्माची दीक्षा देण्यात आली. यंदा पुस्तक विक्रेते मोठ्या संख्येने येथे आले होते. यावेळी सृष्टी परिसरात सुमारे १३० दुकाने लावण्यात आली होती. त्यामध्ये ७० दुकाने पुस्तकांची, १० दुकाने सीडी आणि कॅसेटची, सहा दुकाने छायाचित्र विक्रेत्यांची, चार दुकाने जिजाऊ मूर्ती, शिवाजी मूर्ती आणि फोटो फ्रेमची, चार दुकाने बचतगटांची, एक संगणक साहित्य विक्रीचे, ट्रॅक्‍टर, कॅलेंडर, खाद्यपदार्थ आदी दुकानांचा समावेश होता. जिजाऊ सृष्टीवर पुस्तक विक्रेत्यांचे स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ७० पुस्तकांच्या दुकानातून १० लाख पुस्तकांची विक्री झाली असून, त्यामध्ये ७० टक्के आंबेडकरी साहित्याचा समावेश होता. त्याचप्रमाणे शिवधर्म साहित्याची पुस्तकेही सर्वांचे आकर्षण ठरली होती. डॉ. आ. ह. साळुंखे, मा. म. देशमुख, प्रा. अशोक राणा, प्रा. जेमिनी कडू, पुरुषोत्तम खेडेकर आदी दिग्गज लेखकांच्या पुस्तकांना यंदा मोठी मागणी होती. सातारा येथील छोट्या पुस्तक स्टॉलचे संचालक चंद्रकांत मोरे म्हणाले की, जवळपास १० हजारांची पुस्तके यंदा विक्री झाली आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर वाचक येत असल्याने, पुस्तकांची विक्रीही चांगली होते. वर्धा येथील बागडे बुक डेपोचे ईश्‍वर बागडे म्हणाले की, मोठ्या पुस्तक विक्रेत्यांची सुमारे ३० ते ४० हजार रुपयांची, तर छोट्या पुस्तक विक्रेत्यांची १० हजार रुपयांची पुस्तके विक्री झाली. त्यात आंबेडकरी साहित्याचा समावेश अधिक आहे. महाराष्ट्रातील नामवंत पुस्तक विक्रेत्यांनी येथे आपले स्टॉल लावले होते. पुण्याचे जिजाऊ प्रकाशन, शिवमाला विक्री केंद्र, परळी वैजनाथ येथील छत्रपती प्रकाशन, बुलडाण्याचे जिजाऊ पुस्तकालय, बीडचे सावंत बुक स्टॉल, वर्धेचे सुधीर प्रकाशन, बागडे बुक स्टॉल, वर्धा आदी नामवंत पुस्तक विक्रेत्यांनी यंदा हजेरी लावली होती. बहुजन व्याख्यात्यांची ऑडिओ सीडीचीही मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. राष्ट्रमाता जिजाऊ, शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा, छत्रपती शाहू महाराज यांच्या मोठ्या छायाचित्रांना मोठी मागणी होती. यंदा पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणावर झाल्याने, विक्रेत्यांची मात्र चांदी झाली.

tags-
shivdharma ,maratha seva sangh,sambhaji brigade,jijau brigade,jijau,jijamata.jijabai,shivaji,sambhaji,maratha,purushottam khedekar,dr.a.h.salunkhe,shivdharm